जलसंधारणाची कामे यशस्वी करण्यात संजय खैरनार यांचा सिंहाचा वाटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : ’‘आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध जलसंधारणाची कामे यशस्वी होण्यात संजय खैरनार यांचा सिंहाचा वाटा आहे,‘‘ असे प्रतिपादन संस्थेचे समन्वयक विजय हाके यांनी केले.
 
’आर्ट ऑफ लिव्हिंग’चे शिक्षक आणि मालेगाव येथे जिल्हा परिषद विभागात कार्यरत असलेले उपअभियंता संजय खैरनार यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत हाके बोलत होते. ‘‘महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर श्री श्री रविशंकर यांच्या आदेशान्वये गेल्या दोन-तीन वर्षात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. चांदवड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामास महाराष्ट्र शासनाचे बक्षीसदेखील मिळाले. ही कामे यशस्वी होण्यामध्ये संजय खैरनार यांचा सिंहाचा वाटा आहे,‘‘ असे विजय हाके श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले.
  
सन २००० मध्ये संजय खैरनार ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवारात सहभागी झाले. त्यांनी आपली नोकरी सांभाळून कळवण, सिन्नर, चांदवड, मालेगाव भागामध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या विविध कोर्सेसचे आयोजन करून विविध समाज घटकातील व्यक्तींना त्यामध्ये सामील करून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम खैरनार यांनी केल्याचे ते म्हणाले.
 
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदावरी सभागृहात झालेल्या या शोकसभेत संपत सकाळे, निवृत्ती डावरे, बंडू भाबड, चांदवडचे बाळासाहेब वाघ, विलास ढोमसे, आर.एन.पाटील, नगरसेवक योगेश हिरे, स्वामी आनंद वैशंपायन, नंदकिशोर अहिरे, किशोर पाटील, अॅड. राजेंद्र घुमरे, स्मृती ठाकूर, संजय बडवर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@