तिहेरी तलाक विरोधी विधेयक काँग्रेसने पारित होऊ दिले नाही: अनंत कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
दिल्ली: लोकसभेत बहुमताने पारित झालेले तिहेरी तलाक विरोधी विधेयक काँग्रेसमुळे राज्यसभेत पारित होवू शकले नाही असा आरोप संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसवर केला आहे. आज संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले असल्याने या अधिवेशनात कोणती कामे झाली याची माहिती देण्यासाठी दिल्ली येथील संसद भवनात ही पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
 
 
 
हे सत्र पूर्णपणे यशस्वी ठरले असून दोन्ही सदनात अधिक काम झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दोन्ही सदनात मिळून २२ विधेयक पारित करण्यात आले असून लोकसभेत १३ तर राज्यसभेत ९ विधेयक पारित करण्यात आले असल्याची महत्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
 
काँग्रेस पक्ष नेहमी महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो मात्र तिहेरी तलाक विरोधी विधेयक काँग्रेसने राज्यसभेत पारित होऊ दिले नाही. वेगवेगळ्या कारणाने काँग्रेसने हे विधेयक प्रलंबित केले त्यामुळे ते विधेयक लोकसभेत बहुमताने पारित झाले मात्र, राज्यसभेत हे विधेयक पारित होवू शकले नाही असेही ते यावेळी म्हणाले. 
 
@@AUTHORINFO_V1@@