सर्वांगीण आणि सर्वसमावेशी विकास गरजेचा : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली: देशामध्ये सध्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशी विकास गरजेचा आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. आज नीती आयोगाद्वारे आयोजित केलेल्या 'ट्रांसफॉर्मिंग इंडिया बाय २०२२, कलेक्टर्स-द चैंजिंग एजेंट्स' या कार्यक्रमात संबोधित करतांना ते बोलत होते यावेळी त्यांनी वरील मत मत व्यक्त केले.
 
 
 
 
 
देशात जर सर्वांगीण आणि सर्वसमावेशी विकास घडवून आणायचा असेल तर तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे तसेच देशातील काही बुद्धीजीवी नागरिकांनी ठरवले तर कोणतीच ताकद आपल्याला परिवर्तन घडवून आणण्यापासून रोखू शकत नाही असे ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
प्रशासनामध्ये काही अधिकाऱ्यांना दुर्गम भागात पाठवले जाते मात्र या दुर्गम भागात आपल्याला विकास कसा करता येईल या दृष्टीने आपण या आव्हानाला स्वीकारायला हवे. प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला येत असते म्हणून आपली जबाबदारी झटकण्यापेक्षा ती कशी संधीत बदलता येईल याचा विचार नेहमी करायला हवा असे ते यावेळी म्हणाले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@