नंदुरबार पालिकेची कचऱ्यापासून खत निर्मिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नंदुरबार : नंदुरबार नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भाग घेतलेला आहे. सदर सर्वेक्षणमध्ये अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील कचर्‍याची ओला व सुका असे वर्गीकरण करूनच नगरपरिषदेच्या घंटागाडीत जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
 
 
नगरपरिषदेमार्फत दुधाळे शिवार येथे ओला कचर्‍यावर बायोकल्चर पध्दतीने खत प्रक्रिया करण्यास सुरूवात केलेली आहे व हे तयार केलेले खत शेतकरी बांधव व पारसबाग मालकांना अल्प दरात उलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच शहरातील कचरा वेचकांमार्फत गोळा करण्यात आलेले प्लॉस्टिक व इतर भंगार साहित्य न.प.आरोग्य विभागात योग्यत्या मोबदल्यात स्विकारण्यात येईल. तरी इच्छूक शेतकरी बांधव, पारस बाग मालक, तसेच कचरा वेचक यांनी वर्गीकरण करूनच न.प.च्या घंटागाडीत जमा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्षा व मुख्याधिकारी, नंदुरबार नगरपरिषद यांनी केलेले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@