कारागृहात असणाऱ्या महिलांचे जीवन सुधारणे गरजेचे: मनेका गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
दिल्ली: ज्या महिला कारागृहात आपली शिक्षा भोगत आहेत अशा महिलांचे जीवन सुधारणे गरजेचे आहे म्हणून भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने यासाठी एक मोठे पाऊल उचलले असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली. आज दिल्ली येथे या विषयासंबंधी एक बैठक घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.
 
 
 
राष्ट्रीय महिला आयोगासोबत मिळून हा नवीन उपक्रम महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरु केला आहे. यामध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने राज्यांतील सगळ्या कारागृहात एक अहवाल पाठवला आहे. या अहवालात विचारलेली माहिती सगळ्या राज्यांतील कारागृहांना १५ फेब्रुवारीपर्यंत देणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
 
 
 
यामुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला यांच्या जीवनात काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न सरकार या माध्यमातून करणार आहे. या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली असून कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिलांसाठी शिक्षण, आरोग्य सुविधा आणी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय करता येईल याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. 
@@AUTHORINFO_V1@@