भारत वि. द.आफ्रिका : पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
न्यूलँड: न्यूलँडमधील केपटाऊन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारताच्या संघाने द. आफ्रिकेला मैदानात उतरताच धक्का दिला आहे. शून्य धावांवरच भारताने द. आफ्रिकेच्या डीन एल्गर याला तंबूत धाडले.
 
 
 
 
 
 
 
  
त्यानंतर एडिन माक्रम याला देखील केवळ पाच धावांवर बाद करण्यात आले असून हाशिम अमला याला तर केवळ तीन धावांवर परत पाठवण्यात आले. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताची आक्रमक सुरुवात झाली असून सध्या भारत जोरदार खेळी खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जेवणाच्या वेळेपर्यंत १०७ धावा झाल्या असून ३ बाद झाले आहेत. आता यापुढील सामन्यात काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 



 
@@AUTHORINFO_V1@@