संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी पासून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

१ फेब्रुवारीला मांडण्यात येणार अर्थसंकल्प
 
 
 
 
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या भागातील सत्र २९ जानेवारी पासून सुरु होणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली. नवी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आज ते बोलत होते. २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी हे अधिवेशन असेल. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी माहिती अनंत कुमार यांनी दिली.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अर्थसंसकल्पीय अधिवेशनाची निश्चित करण्यात आलेली तारीख २८ फेब्रुवारी होती, मात्र या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून २९ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु करण्यात येणार आहे.
 
याआधी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा सादर करण्यात येत होता, मात्र यावर्षी साधारण अर्थसंकल्पासोबतच रेल्वेचाही अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली वर्ष २०१८-१९ साठी अर्थसंकल्प सादर करतील. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजच संपले. यामध्ये लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले, मात्र राज्यसभेत ते पारित झाले नाही, त्यामुळे तिहेरी तलाक विषयी पुढे काय होते याबद्दल देखील नागरिकांच्या मनात उत्सुकता आहे, तसेच यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सामान्य माणसाला कितपत दिलासा मिळणार याकडेच संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@