भाजपने जारी केला सर्व खासदारांना 'व्हीप'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचे आदेश 





नवी दिल्ली :
संसदेमध्ये सर्व खासदारांनी उपस्थित राहावे, यासाठी भारतीय जनता पक्षांनी आपल्या सर्व खासदारांसाठी 'पक्षादेश' जारी केला आहे. त्यामुळे सर्व भाजप खासदारांना आजपासून संसदेत उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे, अथवा खासदारांवर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील पक्षाकडून देण्यात आला आहे.

संसदेमध्ये सरकारकडून महत्त्वाचे प्रस्ताव मांडत असताना, सर्व भाजप खासदारांनी यावेळी दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित असणे अनिवार्य आहे, असे पक्षाने म्हटले आहे. सर्व जनतेनी मोठ्या आशेने आपल्याला या महत्त्वाच्या पदावर निवडणूक दिले आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाच्या कसोटीमध्ये उत्तीर्ण होणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे पक्षाने म्हटले आहे. म्हणून पक्षाच्या सर्व सदस्यांनी हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सभागृहामध्ये दररोज उपस्थित राहावे, असे पक्षाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने राज्यसभेत मांडलेल्या 'तिहेरी तलाक'संबंधीच्या विधेयकाला राज्यसभेत सध्या विरोधकांनी जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकसभेत विधेयकाला मान्यता दिल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक अडवण्याचा कट विरोधकांनी रचला आहे, असा आरोप सरकारने केला आहे. त्यामुळेच आपल्या सर्व सदस्यांना संसदेत उपस्थित राहण्याविषयी पक्षाने आदेश जारी केल्याचे दिसत आहे.
@@AUTHORINFO_V1@@