अक्षय कुमार आता शूर लढवैय्याच्या भूमिकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

 
मुंबई :  'ऍक्शन हिरो' म्हणून बॉलिवूड मध्ये नामांकित असलेला अक्षय कुमार 'पॅड मॅन' नंतर आता 'केसरी' या चित्रपटाची तयारी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारचा 'फर्स्ट लुक' आज प्रदर्शित झाला. यात अक्षय कुमार शूरवीर "शीख" लढवैय्याच्या भूमिकेत दिसला आहे.
 
 
 
अक्षयने चित्रपटाचे पहिले चित्र ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की "चित्रपटाच्या पहिल्या चित्राच्या माध्यातून तुमच्या पर्यंत पोहोचताना मला खूप अभिमान वाटतोय. २०१८ वर्षाची सुरुवात मी केसरीने करत आहे. मी आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट अतिशय महत्वाकांक्षी असून यासाठी तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर १८९७ साली, अफगाण ओराक्झाई आणि ब्रिटिश भारतीय सेना यांच्यात झालेल्या 'सारगढी' युद्धावर आधारित आहे.
 
 
 
या चित्रपटाचे निर्माते करण जौहर आणि अक्षय कुमार असून, अक्षय कुमार प्रमाणेच करण जौहरही ट्विटरच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करताना दिसला. यावेळी तो म्हणाला की, "मी केसरी चित्रपटासाठी अतिशय उत्सुक आहे. आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. आम्ही आमचा प्रवास आजपासून सुरु करत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असंच राहूद्या."
अनुराग सिंग दिग्दर्शित तसेच धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट पुढल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@