राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावरुन गदारोळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक कधी मंजूर होते याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तिहेरी तलाक विधेयक पारित करण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे, ज्याला सरकारचा विरोध आहे, याविषयावरुन आज राज्यसभेत गदारओळ झाला. मात्र अद्याप तिहेरी तलाक विधेयकाविषयी कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसच्या निवड समितीतील नेमण्याच्या मागणीला मोठा विरोध केला आहे. त्यानंतर राज्यसभेचे काम उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. काँग्रेसच्या वतीने बोलताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी " विधेयकाला निवड समितीकडे पाठवले जावे. सरकार घाई करत असून अशी घाई करण्याचे कारण काय?" असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर ‘राजकीय ढोंग’ करण्याचा आरोप केला. तसेच सरकार विधेयकाला संसदेच्या याच सत्रात संमत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल असेही सांगितले.
 
राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावर बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओबेरॉय यांनी विरोधी पक्षांची बाजू ही नेहमीच स्त्री सक्षमीकरणाची असून सरकारची भूमिका त्याच्या विरोधी आहे, असा आरोप सरकारवर केला. यावरुन वातावरण पेटले आणि खासदार स्मृती ईराणी यांनी त्यावर चर्चेची मागणी केली. तिहेरी तलाक विधेयकाला निवड समितीकडे पाठवण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि विरोधी पक्ष यटांच्यात मोठा गदारोळ झाला. या दरम्यानच राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@