नंदुरबार शहरासह जिल्ह्यात बंद शांततेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
नंदुरबार : दळणवळण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यात राज्य अनुसूचित जमाती कल्याण समिती दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ४ जानेवारीपासून समिती ३ दिवस जिल्हा दौर्‍यावर येणार होती. मात्र राज्यातील परिस्थिती पाहता समितीने आपला नंदुरबार दौरा स्थगित करत पुढे ढकलला. नेहरू चौकात आंदोलन करण्यात आले. शहादा येथे दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली.
 
शहादा, नवापूर येथेही बंद 
काही सामाजिक संघटनांनी रिक्षा फिरवून व सामाजिक माध्यमांतून बंदचे आवाहन केले असल्याने शहादा शहरात सकाळपासूनच सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे जीवनावश्यक औषधी विक्रीची काही दुकानीही बंद होत्या. तर चहा व पानाच्या टपर्‍याही बंद होत्या. रस्त्यांवरील ठेलेगाड्याही बाजारात दिसल्या नाहीत. मेन रोड, खेतीया रोड, दोंडाईचा रोड, सोनार गल्ली, के.एस. मार्केट. पुरुषोत्तम मार्केट, खवीस मार्केट, छप्पन गाळे मार्केट यांसह मुख्य बाजारातील सर्वच दुकाने बंद होती.
 
म्हसावदला एकास मारहाण
 
म्हसावद गावातही निदर्शने करण्यात आली. येथे एका एसटीची तोडफोड करण्यात आली. गाडी तोडफोड करणार्‍यांची व दुकानी बंद करायला लावणाऱ्या आंदोलकांची नवे पोलिसांना दिली या संशायांवरून अनिल खंडेलवाल या कापूस व्यापार्‍याला काही अज्ञात युवकांनी मारहाण केल्याने त्यास शहादा येथे उपचारासाठी दाखल केले होते.
 
शिंदखेडा येथे तणावपूर्ण शांतता
शहरात बुधवारी दलित कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले होते. शहरातील दुकाने, शाळा महाविद्यालय बंद ठेवले होते. दुपारपर्यंत व्यवहार बंद होते. दुपारनंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले. कुठेही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त होता. शहरातील शिवाजी चौकात टायर जाळून शहरात तणावपूर्ण शांतता होती.
@@AUTHORINFO_V1@@