'क्या होगा लालू का ?' - आज होणार अंतिम निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |


रांची :
चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या १६ अन्य साथीदारांच्या शिक्षेसंबंधीचा अंतिम निर्णय आज होणार आहे. रांची येथील सीबीआय विशेष न्यायालय आज लालू आणि त्यांच्या अन्य साथीदारांच्या शिक्षेसंबंधी अंतिम सुनावणी करणार आहे.

विशेष म्हणजे लालू यांच्या शिक्षेसंबंधीची अंतिम सुनावणी ही कालचा करण्यात येणार होती. परंतु न्यायालयातील वकील बिंदेश्वरी प्रसाद यांच्या अकस्मात निधनामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता. तसेच अंतिम सुनावणीपर्यंत लालू आणि त्यांच्या सर्व साथीदारांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत.

गेल्या २३ तारखेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने चारा घोटाळातील आणखीन एक आरोपी असलेले कॉंग्रेस नेते तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांची सबळ पुराव्यांअभावी मुक्तता केली होती. मिश्रा यांना मुक्त केल्यामुळे तसेच लालू यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राजदने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.
@@AUTHORINFO_V1@@