पाकिस्तानचे पुन्हा एकदा नापाक कृत्य, कुलभूषण प्रकरणी खोटा व्हिडियो प्रसिद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |

 
कथित हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले कुलभूषण जाधव यांचा एक खोटा व्हिडिओ पाकिस्तानने प्रसिद्ध करुन पुन्हा एकदा आपले नापाक कृत्य सिद्ध केले आहे.हे. भारतीय अधिकारी आपल्या आईवर ओरडल्याचा आरोप या व्हिडिओमधून कुलभूषण जाधव यांनी केल्याचे पाकिस्तानने दाखविले आहे. पाकिस्तानमध्ये आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटल्याचेही या व्हिडियोमध्ये दाखविण्यात आले आहे.
 
आज संसदेत सरकारने या प्रकाराचा विरोध करत, पाकिस्तानच्या या कृत्याचा निषेध केला आहे.  
 
 
 
यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी उत्तर देत "पाकिस्तानकडून अशाच कृत्याची अपेक्षा होती. मात्र त्यांना कळायला हवं की अशा प्रकारच्या प्रपोगंडामुळे कुणाचाच त्यांच्यावर विश्वास बसणार नाही." असे म्हटले आहे. 
 
 
 
 
 
या व्हिडिओमध्ये कुलभूषण यांनी स्वतःला भारताच्या नौदलाचा कमिशन्ड अधिकारी म्हटले आहे. तसेच, आपल्याला पाकिस्तानात त्रास होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मला ठणठणीत पाहून माझी आई खूश झाली होती. मात्र, ती घाबरल्यासारखी दिसत होती. तिला विमानात घाबरवून आणण्यात आले होते. एवढेच नाही तर आमच्या संवादानंतरही माझ्या आई आणि पत्नीवर भारतीय अधिकारी ओरडून बोलत होते, असे कुलभूषण या व्हिडिओतून बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडियो म्हणजे पाकिस्तानचा एक डाव असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या व्हिडियोमध्ये "मी गुप्तहेर म्हणून काम करत असल्याची माहिती तुम्ही का लपवून ठेवत आहात?" असा प्रश्न देखील जाधव यांनी उपस्थित केल्याचे दाखवण्यात आले आहे.
 
२५ डिसेंबरला जाधव यांची पत्नी व आई त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. यावेळी त्या दोघींना पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक मिळाली होती. तसेच, इंटरकॉमच्या माध्यमातून त्यांच्यातील संवाद झाला होता. या घटनेचा दुसऱ्या दिवशी देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता पाकिस्तानने हा व्हिडियो व्हायरल करुन पुन्हा एकदा आपले नापाक कृत्य सिद्ध केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@