महानगरपालिकेकडे अनेक हॉटेलांची नोंदच नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 

 
नाशिक : शहरात शेकडो हॉटेल्स असताना मनपाकडे केवळ ७२ हॉटेल्सची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ ८० हॉटेल्सने त्यामध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली असल्याची कबुली खुद्द मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी दिली आहे.
 
शहरात कोणतीही इमारत उभी करायची असेल तर त्याची माहिती महापालिकेला देणं बंधनकारक आहे. हॉटेलसंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंदणी आवश्यक आहे. फायर सेफ्टी ऑडिट बंधनकारक आहे. मात्र हॉटेल व्यावसायिक हे सर्व नियम धाब्यावर बसवत असल्याने कमला मिलसारख्या घटना वारंवार घडत आहेत.
 
हॉटेल्स असोसिएशनकडे नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशे आणि मनपा हद्दीतल्या अडीचशे हॉटेल्सची नोंदणी आहे. मात्र यंत्रणांच्या कृपादृष्टीमुळे शहरात अनधिकृत हॉटेल्स, धाबे, हुक्का पार्लरचं पेव फुटले आहे. त्याला वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@