फुले दाम्पत्य सन्मान रॅलीला नाशिकमधून प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले फोरम ऑफ सोशिओ कमर्शियल ऍण्ड इंडस्ट्रीयल ऍक्टिव्हिटी या संस्थेच्या नुकत्याच काढण्यात आलेल्या भिडेवाडा ते फुले वाडा फुले दाम्पत्य सन्मान रॅलीला नशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला.
 
या रॅलीमध्ये वारकरी पथक, नगारा वाहन, महात्मा फुले दाम्पत्य वेशातील समाजबंधू व भगिनी, महिला ढोल पथक, महात्मा फुले दाम्पत्य रथ यांच्या माळी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
१ जानेवारी १८४८ रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या कार्याची जाणीव ठेऊन गेल्या अनेक वर्षांपासून ’फुले दांपत्य सन्मान’दिवस म्हणून पुणे येथे साजरा करून विविध मागण्यांसाठी जनजागृती रॅली काढण्यात येते यावर्षी देखील राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
यावेळी आंबेडकर चळवळीचे जोगेंद्र कवाडे, अविनाश ठाकरे, माजी आमदार कमल ढोले पाटील, राजाभाऊ रायकर, संचालक, माळी साखर कारखाना मोहनराव लांडे, सासवड माळी साखर कारखाना एम.डी. रंजन गिरमे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिक जिल्ह्यातून माळी समितीचे अध्यक्ष विजय व सरचिटणीस हरिश्‍चंद्र (अण्णा) विधाते, अरुण थोरात, विजय अभंग, शंतनू शिंदे, राजेंद्र ताजने, महेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@