लालूंच्या शिक्षेसाठी ‘तारीख पे तारीख’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
रांची: चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांच्यासंबंधीची अंतिम सुनावणी आता उद्या करण्यात येणार असल्याची घोषणा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने केली आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या अन्य साथीदारांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
 
 
यामुळे आता लालूंच्या शिक्षेसाठी ‘तारीख पे तारीख’ न्यायालय देत असल्याचे म्हटले जात आहे. परवा देखील न्यायालयाने कालची अंतिम तारीख दिली होती. मात्र आज न्यायालयाने पुन्हा एकदा उद्यावर हे प्रकरण ढकलेले आहे. त्यामुळे चारा घोटाळ्यात अडकलेल्या लालूंच्या प्रकरणावर आता कधी सुनावणी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
 
 
बिहारमध्ये झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी गेल्या २३ तारखेला न्यायालयाने लालू आणि त्यांच्या सर्व साथीदारांना दोषी ठरवत, शिक्षेसाठी पात्र ठरवले. यानंतर यासंबंधीची अंतिम सुनावणी आज करणार असल्याचे सांगितले होते. परंतु न्यायालयाने या सुनावणीला उद्यापर्यंत विराम दिला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@