पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. या गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये आज सीमा सुरक्षा दल अर्थात ‘बीएसएफ’चा एक जवान शहीद झाला असल्याची बातमी सध्या मिळत आहे. 
 
 
 
तसेच जम्मू-काश्मीरमधील बोबियानमधील चक डूलमा पोलीस स्थळावर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. अजून देखील या परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. या गोळीबाराला भारतीय जवान देखील चोख प्रतिउत्तर देत आहे. पाकिस्तानकडून दरवेळी अचानक गोळीबार केला जातो मात्र प्रत्येक वेळी भारतीय जवान पाकिस्तानच्या गोळीबारास चोख प्रतिउत्तर देत असतात. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@