बँगलोरच्या सूक्ष्म शिल्पकलाकाराने खडूवर साकारली योगासने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
पंतप्रधानांची घेतली भेट 

दिल्ली: बँगलोरमधील एका सूक्ष्म शिल्पकलाकाराने खडूवर योगाची विविध आसने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिल्प साकारले आहे. हे शिल्प सचिन यांनी आज नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना भेट स्वरुपात दिले.
सचिन संघे हे पेशाने संगणकीय अभियंता (Software Engineer) आहेत. मात्र तरीही सूक्ष्म शिल्पकलेची आवड त्यांनी जोपासली आहे. खडूवरील सूक्ष्म शिल्पकलेसोबतच पेन्सिलच्या शिसावरही ते उत्तम शिल्प साकारतात. यापूर्वी त्यांनी लिटिल सचिन तेंडूलकर, शिवरात्री विशेष शिल्प, ऑस्कर ट्रॉफी, भारताची राजमुद्रा, मातृ दिन विशेष, भगवान महावीर, अमिताभ बच्चन असे अनेकांचे शिल्प साकारले आहे. 

 
 
तसेच खडूवर त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, सामाजिक कार्यकर्त्या, मदर टेरेसा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, त्यांची दांडी यात्रा, २४ जैन तिर्थकर, राहुल द्रविड, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी आणि त्यांची आई, ताजमहल, दूर्गा देवी, गणपती, बाळकृष्ण, बाहूबली, कबाली, भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, रक्षाबंधन विशेष यापासून ते सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांसारख्या अनेक दिग्गजांचे शिल्प त्याने साकारले आहे. 

 
यापूर्वी सचिन यांना एमटीव्ही नेसकॅफे लॅब्सकडून स्टार अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच श्रवणबेळगोळ येथे झालेल्या राष्ट्रीय जैन युवा संम्मेलनामध्ये आदर्श जैन युवा पुरस्कार ही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. 
सचिन संघे यांना दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन ट्विटरवर फॉलो करत असून त्यांच्या या सूक्ष्म शिल्पकलेचे स्मृती इराणी, राहुल द्रविड, रामनाथ कोविंद यांनीही कौतुक केले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@