सलग दुसर्‍या दिवशीही कर्जत बाजारपेठ बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 

 
 
 

व्यापारी फेडरेशनतर्फे पोलिसांना निवेदन सादर

 
 
कर्जत : भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील आंबेडकरवाडी संघटनांनी दि. २ जानेवारी रोजी जाहीर निषेध करून तीन तास कर्जतची बाजारपेठ बंद केली होती. मात्र, दि. ३ जानेवारी रोजी पुन्हा सलग दुसर्‍या दिवशीही कर्जतच्या बाजारपेठेत बंद पाळण्यास भाग पाडण्यात आल्यामुळे आजही कर्जतची बाजारपेठ बंद होती. यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत कर्जतमधील व्यापारी फेडरेशनने पोलीस ठाणे आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी लेखी निवेदन सादर केले आहे.
 
 
 
भीमा-कोरेगावमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून दि. ३ जानेवारीला आंबेडकरवादी संघटनांनी ’कर्जत बंद’ची हाक दिली होती. झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जतमधील व्यापार्‍यांनीही आपली दुकाने बंद ठेवली होती. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी दि. ३ जानेवारीला ’महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. मात्र, कर्जतमध्ये सर्व आंबेडकरवाडी संघटनांनी २ जानेवारीलाच बंद पाळून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे कर्जतमध्ये आज कोणत्याही संघटनेने बंदची हाक दिलेली नव्हती. मात्र, दुपारी अचानक कर्जतच्या बाजारपेठेतून दहा-बारा जण फिरू लागले. त्यांनी व्यापार्‍यांना शिवीगाळ करीत आणि दुकाने फोडण्याची धमकी देऊन दुकाने बंद करण्यास सांगितले, असे व्यापारी फेडरेशनचे म्हणणे आहे.
 
 
 
"भीमा-कोरेगावमध्ये झालेली घटना वाईटच आहे. म्हणूनच आम्ही काल दुकाने बंद ठेवून तिचा जाहीर निषेधही केला आहे. मात्र, आज शिवीगाळ आणि धमकी देऊन दुकाने बंद करण्यास सांगणे हे काही चांगले नाही," असे सांगत याबाबत सर्व व्यापार्‍यांनी दुकाने बंद करून थेट कर्जत पोलीस ठाणे गाठले. कर्जतच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि त्यांच्याकडे याबाबतचे लेखी निवेदनही सादर केले. या निवेदनाची प्रत तहसीलदार कार्यालयातही देण्यात आली आहे. झालेल्या प्रकाराबद्दल व्यापारी फेडरेशनने एक दिवस निषेध दर्शविला होता. याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातच या संघर्षाचे पडसाद उमटलेले दिसून आले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@