भारतीय जवानांकडून पाकिस्तानच्या दोन चौक्या उध्वस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील काही महत्वाच्या ठिकाणी आज सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार केला जात होता. त्यामुळे सकाळपासून भारतीय जवान या गोळीबाराला चोख प्रतिउत्तर देत होते. आता दुपारच्या सुमारास भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दोन चौक्या उध्वस्त करत पाकिस्तानला चांगलाच चोप दिला आहे. 
 
 
 
आज सकाळी झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला होता. पाकिस्तानकडून सकाळपासून जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात येत होता. तसेच जम्मू-काश्मीरमधील बोबियानमधील चक डूलमा पोलीस स्थळावर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय जवानांनी आज पाकिस्तानच्या दोन्ही चौक्यांवर निशाना साधत दोन्ही चौक्या उध्वस्त केल्या आहे. 
 
 
 
जम्मू-काश्मीर भागात सध्या जवानांची तारेवरची कसरत सुरु आहे. जम्मू-काश्मीरमधील अर्निया भागात आज सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफकडून काही घुसखोरांना मारण्यात जावानांना यश मिळाले आहे. त्यामुळे एकीकडे पाकिस्तानचा गोळीबार आणि एकीकडे घुसखोऱ्यांची घुसखोरी यामुळे सध्या जवानांची तारेवरची कसरत सुरु आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@