शेतकरी सुकाणू समितीची १६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांशी चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |
 

नाशिक : शेतकर्‍यांना कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी येत्या दि. १६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
 
सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास दि. १ मार्चपासून सरकारशी ’असहकार आंदोलन’ पुकारण्यात येईल, असा इशाराही पदाधिकार्‍यांनी दिला आहे. शेतकरी सुकाणू समितीची राज्यस्तरीय बैठक विश्रामगृहावर पार पडली. शेतकरी नेते रघुनाथ पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
 
राज्यातील सरकार हे शेतकरीविरोधी असून राज्यात अराजकता माजली असल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना आमदारांची पगारवाढ, कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग देण्यात सरकार दंग आहे. आमच्या पैशांवरच ही मजा सुरू असल्याची टीका करतानाच शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@