जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |


 


पुणे : गुजरातचा नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद या दोघांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारवाडा येथे झालेल्या 'यल्गार परिषदे'त मेवाणी आणि खालिद यांनी चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात राहत असलेल्या अक्षय बिक्कड या २२ वर्षीय विद्यार्थाने या दोघांसंबंधी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. उमर खालिद आणि मेवाणी यांनी 'एल्गार परिषदेत' केलेल्या वक्तव्यामुळेचा दोन समाजांमध्ये वाद झाला आहे, असे अक्षय याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे दोन समाजांमध्ये वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या वक्तव्यामुळे पोलिसांनी देखील भारतीय दंडविधान संहितेनुसार कलम १५३ (अ), ५०५ व ११७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या ३१ तारखेला मेवाणी आणि खालिद याने 'एल्गार परिषदेत' संघ आणि भाजपविरोधात गरळ ओकत समाजातील एका विशिष्ट समूहासंबंधी अत्यंत चिथावणीखोर असे भाषण केले होते. त्यानंतर एक तारखेला भीमाकोरेगाव येथील जमावावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्यामुळे राज्यामध्ये नवा जातीय'वाद' पेटला होता.
@@AUTHORINFO_V1@@