संविधान आणि सैनिकांनंतर संघामुळे देश सुरक्षित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2018
Total Views |

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.टी. थॉमास यांचे प्रतिपादन




तिरुअनंतपुरम : 'संविधान, लोकशाही आणि सैनिकांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे देशातील नागरिक सुरक्षित आहेत.' असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायाधीश के.टी. थॉमास यांनी केले आहे. कोटायम येथे सुरु असलेल्या संघाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित स्वयंसेवकांना संबोधित करताना ते बोलत होते.

'संघ आपल्या स्वयंसेवकांना 'देश रक्षणाचे धडे आणि संस्कार देतो. काही लोक हे संघाच्या कसरती आणि प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, परंतु स्वयंसेवकांच्या आणि देशाच्या रक्षणाच्या दृष्टीनेच संघ त्यांना प्रशिक्षण देतो. संघाच्या या प्रशिक्षणामुळे आज देशातील सामान्य जनता आणि देश सुरक्षित आहे.' असे ते म्हणाले. तसेच संविधान, लोकशाही, लष्कर आणि संघ या चार घटकांमुळेच आज भारत देश पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याच बरोबर भारतात हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरला जातो. परंतु हिंदू म्हणजे अनेक संस्कृतींचा संगम आहे. भारतामध्ये अनेक संस्कृती अनेक वर्षांपासून नांदत असल्यामुळे भारताला इतिहासात आणि पुराण काळात हिंदूस्थान ( म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू संस्कृती नांदते असे स्थान म्हणून ) ओळखले जात होते. त्यामुळे सेक्युलिरीझमचा चुकीचा अर्थ लावून धर्म न मानणे अथवा धर्माचा त्याग करणे हे चुकीचे आहे असे देखील त्यांनी यावेळी म्हटले

तसेच संघाच्या अनेक कार्यांची माहिती देत संघाने आणीबाणी दरम्यान केलेल्या अनेक आंदोलनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. 'संघ ही देशातील अशी एकमेव संघटना आहे, जिने देशाला आणीबाणीमधून बाहेर काढले. संघाने देशात लागू झालेल्या आणीबाणी विरोधात सातत्याने आंदोलने केली व देशातून आणीबाणी नष्ट करण्यात यश मिळवले. त्यामुळे देशात आणीबाणी नष्ट करण्याचे पूर्ण श्रेय हे संघाला जाते' असे देखील ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@