पाणी टंचाईच्या संभाव्य समस्येवर तातडीने उपाय करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांचे आदेश





अकोला : गेल्या वर्षी जिल्ह्यमध्ये पाऊस सरारारी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसू नये, यासाठी टंचाई आराखडयानुसार प्रस्तावित केलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

बैठकीच्या सुरुवातील जिल्हाधिकारी यांनी पाणी टंचाई निवारणार्थ ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. त्यानंतर जानेवारी ते जून-२०१८ या कालावधीत टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडयात कोणत्या नव्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे, या संबंधीची माहिती तालुकानिहाय तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यानंतर जिल्ह्यात सध्या आवश्यक असलेल्या कामांची माहिती देत, काही निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सरंपच, तलाठी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन गावातील टंचाई परिस्थितीचा आढावा घ्यावा. कोणत्या उपाययोजना करण्यात येतील, याचा सुधारीत टंचाई आराखडयात समावेश करावा. गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आराखडा मंजुरीसाठी तहसिलदारांमार्फत प्रशासनाकडे सादर करावा. तात्पुरती पुरक नळ योजना, नळयोजना विशेष दुरुस्ती ही कामे प्राधान्याने आराखडयात समाविष्ट करावीत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आलेले प्रस्तावाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रक्रीया तातडीने पूर्ण करावी. तसेच भूजल सर्वेक्षण विभागाने प्रस्तावानुसार केलेल्या सर्वेक्षणान्वये दिलेल्या अहवालानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कामाचे कार्यादेश काढावेत. या कामांमध्ये कुठल्याही प्रकारे दिरंगाई होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
@@AUTHORINFO_V1@@