दहशतवादाशी आमचा लढा सुरु राहील - ट्रम्प यांचे प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |

 
गेल्यावर्षी आयसीसला पृथ्वीतलावरून नेस्तनाबूत करण्याची आम्ही प्रतिज्ञा केली होती, ते धोरण यावर्षी देखील राबविण्यात येईल, दहशतवादाशी आमचा लढा सतत सुरु राहील, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेच्या केंद्रीय पातळीवर देण्यात आलेल्या भाषणात त्यांनी या मुद्द्याला हात घातला.
 
 
 
दहशतवादी हे केवळ अपराधी नसून ते दुराचाराने लढणारे लढाऊ आहेत. जेव्हा इतर प्रदेशांत ते आढळतात त्यावेळी त्यांचा खरा चेहरा बाहेर पडतो, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दहशतवादाला कुठल्याही प्रकारचा आश्रय देणार नाही, असे धोरण ट्रम्प यांनी गेल्यावर्षीपासूनच अमेरिकेत राबविले आहे. त्याचाच परिणाम म्हणून ट्रम्प यांनी तालिबान संघटनेशी बोलणी करायला नकार दिला आहे.
 
 
 
गेल्या शनिवारी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनाशी कसलही चर्चा न करताना थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला.
 
 
अमेरिकेत होणारे स्थलांतर यामुद्द्याला त्यांनी पुन्हा एकदा स्पर्श केला असून, बेकायदेशीर येणारे लोंढे थांबविले पाहिजे असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. यावर व्हाईट हाउसचे एक सत्र घेणार असल्याची त्यांनी यावेळी चर्चा केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@