चर्चा नाकारल्यास आणखी रक्तपात : तालिबान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर तालिबानची तिखट प्रतिक्रिया




काबुल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांती नव्हे तर युद्ध पाहिजे आहे. परंतु तालिबानचा आजपर्यंत हा इतिहास राहिला कि, तालिबानने आपल्या शत्रूला नेहमीच खडे चारले आहेत, त्यामुळे ट्रम्प यांनी तालिबानशी चर्चेला नकार दिल्यास ट्रम्प यांना आणखीन रक्तपाताला सामोरे जावे लागेल अशी धमकी तालिबानकडून देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रम्प तालिबानसंबंधी केलेल्या वक्तव्यावर तालिबानकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली असून ट्रम्प यांच्या युद्धाच्या भाषेला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे तालिबानने म्हटले आहे.
तालिबानकडून नुकतेच यासंबंधी एका पत्र प्रदर्शित करण्यात आले असून यामध्ये ट्रम्प यांच्या तालिबान संबंधीच्या वक्तव्यावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 'ट्रम्प आणि त्यांच्या सहकार्यांना हे समजायला हवे कि क्रिया केल्यास त्या उलट प्रतिक्रिया देखील मिळते. तालिबानवर हल्ला केल्यास तालिबान तुमचे फुलांनी स्वागत करणार नाही. तालिबानने आतापर्यंत नेहमी आपल्या शत्रूंना खडे चारले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैनिकांचे मोठे नुकसान होईल हे ट्रम्प यांनी ध्यानात घ्यावे' असे तालिबानने आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये देखील आणखीन रक्तपात केला जाईल असा इशारा देखील तालिबानने दिला आहे.
गेल्या शनिवारी तालिबानने काबुलमध्ये केलेल्या एका दहशतवादी हल्ल्यामध्ये १०३ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. यावर अमेरिकेने तालिबानच्या या हल्लाचा निषेध करत तालिबानबरोबर चर्चा करता, त्यांच्यावर थेट कारवाई करू असे वक्तव्य केले होते. तसेच तालिबानविरोधात अमेरिकन सैन्य अत्यंत कठोर कारवाई करत असून लवकरच तालिबान नष्ट होईल, असे देखील ते म्हणाले होते.


@@AUTHORINFO_V1@@