जिल्हा परिषद शाळेस साऊंड सिस्टिम भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा विस्तारक राहिलेले रामदास स्वामी होळकर यांच्या स्मरणार्थ लासलगावच्या जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी साऊंड सिस्टिम भाजप शहर अध्यक्ष रवींद्र होळकर मित्रमंडळाकडून सप्रेम भेट देण्यात आले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सामाजिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक तथा शिक्षणक्षेत्रात ही संघटना काम करीत असते. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या संस्थेचे स्वयंसेवक खूप मदत करतात.
 
या प्रसंगी शहर अध्यक्ष रवींद्र होळकर, माज़ी पं.स. सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख प्रकाश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आर.व्ही. गायकवाड, राजाभाऊ चाफेकर, बकरेशेठ, किशोर जाधव, डॉ. अनिल बोराडे, अमित बकरे, राम बोराडे, योगेश गलांडे, विकी टर्ले, गणेश जोशी, उदय जाधव, दत्ता पाटील, भैया भंडारी, सचिन काळुंखे, बिपीन छाबडा, योगेश हिंगमिरे, बाळासाहेब होळकर, अनिल भागवत, मुख्याध्यापिका खैरे, गवळी मॅडम, भावसार मॅडम तसेच विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@