अंडर-१९ च्या उपांत्य फेरीत भारताकडून पाकचा धुव्वा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |

तब्बल २०३ धावांनी पाकिस्तानचा पराभव

भारत ९ बाद २७२ धावा, पाकिस्तान मात्र ६९ धावांवरच संघ गारद

 
 
 
न्युझीलंड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्युझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा पूर्णपणे धुव्वा उडवला असून तब्बल २०३ धावांनी भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताच्या शुभम गिल याच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय साजरा केला आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने थेट अंतिम सामन्यात धडक घेतली असून यापुढील सामन्यात विश्वचषकासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे आव्हान असणार आहे.


क्रिस्टचर्चा येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने आपल्या दमदार खेळीचे प्रदर्शन केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासून पाकिस्तान संघाचा समाचार घेण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला मैदानात आलेल्या कर्णधार पृथ्वी शा (४१) आणि मनोज कारला (४७) यांनी पहिल्या बळीसाठी ८९ धावांची भागादारी रचून भारताचा पाया मजबूत करून दिला. यानंतर कर्णधार शा नंतर मैदानात आलेल्या शुभम गिल याने आपल्या दमदार खेळीचे प्रदर्शन करत ९४ चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावांची खेळी करत भारताचा धाव आणखीन मजबूत केला. यानंतर हर्विक देसाई (२०), अंकुल रॉय (३३) यांच्या खेळीच्या बळावर भारताने ५० षटकांमध्ये ९ बाद २७२ धावांची मजल मारली. याबदल्यात पाकिस्तानकडून मुहम्मद मुसा याने ६७ धावांच्या बदल्यात्त भारताचे ४ बळी घेतले तर अर्शद इक्बाल याने भारताचे ३ गडी माघारी धाडले होते.




यानंतर आलेल्या मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाची डावाच्या सुरुवातीपासून घसरगुंडी उडाली होती. भारताने दिलेल्या २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता अवघ्या १० धावांवरच पाकिस्तानने आपला पहिला गडी गमावला. लागोपाठ 'येरे माझ्या मागल्या' या प्रमाणे सुरुवातीच्या ३० धावांमध्ये पाकिस्ताने आपले ४ गडी गमावले व शेवटच्या ४० धावांमध्ये आपले सर्व गडी गमावात पाकिस्तानच्या डाव ६९ धावांमध्येच संपुष्टात आला. पाकिस्तानच्या रोहिल नझीर (१८), साद खान (१५) आणि मोहम्मद मुसा (११) या तीनच खेळाडूंना धावांचा दुहेरी आकडा गाठता आला आहे. याबदल्यात भारताकडून ईशान पोरेल याने एकट्या अवघ्या १७ धावांमध्ये पाकिस्तानच्या ४ खेळाडूंना परत तंबूत धाडले, तर त्यापाठोपाठ शिवा सिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येक दोन दोन गडी बाद केले.

अंडर-१९ स्पर्धेमध्ये भारताचा हा खूप मोठा विजय मानला जात आहे, तब्बल २०३ धावांनी पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे भारताच्या अंडर १९ क्रिकेट संघाचे यामुळे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत भारता अंडर १९ संघ अत्यंत उत्तम कामगिरी करत असून विश्वचषकाच्या एक मजबूत दावेदार म्हणून पुढे जात आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे.



@@AUTHORINFO_V1@@