पर्यावरण पूरक गोमय होळीसाठी नाशिकमध्ये तयारी सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
संघाच्या गोसेवा विभागातर्फे देशी गायीच्या गोवऱ्या वितरित करणार
 
 
 
नाशिक, दि.२९ (प्रतिनिधी): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोसेवा विभागातर्फे पर्यावरण पूरक गोमय होळीचे अभियान चालविले जात असून नाशिकमध्ये देखील त्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. यंदा गुरुवार दि.१ मार्च रोजी होळी आहे. गोसेवा विभाग नाशिक शहर, जिल्हा, रा. स्व. संघ नाशिक व श्री गुरूजी रुग्णालय संचालित गोसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रशुध्द पद्धतीने गोमय होळी साजरी करण्यासाठी देशी गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या खास आपणासाठी उपलब्ध असल्याची माहिती गोसेवा विभागातर्फे देण्यात आली.
या संदर्भात आज शंकराचार्य संकुलातील स्व. नानाराव ढोबळे सभागृहात काही नगरसेवकांची बैठक आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, संभाजी मोरुस्कर आदींच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी रा. स्व. संघाच्या गोसेवा विभागाचे प्रांत प्रमुख शेखर धर्माधिकारी, विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. “नाशिक शहरात एक लाख देशी गायीच्या गोवऱ्या विविध सहा मंडलात वितरीत करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू,” असे आ. बाळासाहेब सानप यांनी सांगितले.
दरम्यान, गोसेवा समितितर्फे २६ वनवासी गावात चालणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेली साचेबद्ध व ऐरंड व कडूनिंब यांचा वाळलेला पाला पाचोळा वापरून तयार केलेल्या गोवऱ्या उपलब्ध आहेत. त्या नाशिकच्या नगरसेवकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शेखर धर्माधिकारी यांनी गोमय होळीचे अनेक फायदे सांगितले. देशी गायीच्या ताज्या शेणात २३ टक्के प्राणवायु व ६० टक्के मिथेन गॅस असतो. गोवरीत २७ टक्के प्राणवायु असतो व शेणात किरणोत्सर्गाला (रेडियशनला) शोषुन घेण्याची शक्ति आहे. गोमय भस्म-राख यात प्राणवायु असतो व राख ख़त व किड़नाशक म्हणून वापरु शकता. शेणाच्या गोवऱ्या जाळल्यावर होणाऱ्या धुरामुळे विषारी जंतु, जीवाणू नष्ट होतात व वतावरणाची शुद्धि होते, असे सांगून ते म्हणाले की, “धार्मिकविधि मध्ये होम हवन यज्ञामध्ये देशी गायीच्या गोवऱ्यांवर एक तोळा गायीच्या तुपाचे हवन केल्याने त्यातून एक टन प्राणवायु (ऑक्सीजन) निर्मिती होते (ओझोन) या वायुची कमतरता भरून काढली जाते.” एका अमेरिकन वैज्ञानिकाने-डॉ. मॉक्फ्सरन यांच्या मते देशी गायीच्या शेणाइतका चांगला जंतुनाशक दूसरा कोणताही पदार्थ नाही, अशी माहिती यावेळी धर्माधिकारी यांनी दिली तर संजय कुलकर्णी यांनी प्रास्तविकात विविध समाजसेवी प्रकल्पांची माहिती देवून त्यात सह्भागी होण्याचे आवाहन केले.
याबाबत गोसेवक रमेश प्रताप मानकर गोसेवा विभाग प्रमुख नाशिक 9403692563यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@