राज्यवर्धन सिंह राठौड ट्विटरच्या माध्यमातून साधणार संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |

 
नवी दिल्ली :  देशातील युवकांना खेळांसाठी प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठौड आज सायंकाळी ७.३० वाजता खास 'ट्विटर प्रश्नोत्तर गप्पां'च्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांनी स्वत: याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 
 
 
 
 
देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ऑलिम्पिक आणि तत्सम मोठ्या जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंचावण्यासाठी 'खेलो इंडिया' हा उपक्रम केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्य करण्यात येत आहे. आजचा हा संवाद कार्यक्रम देखील त्यातीलच एक आहे.
 
राज्यवर्धान सिंह राठौड स्वत: ट्विटरवर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. याद्वारे सामान्य जनतेसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळत असल्याचे राज्यवर्धन सिंह राठौड यांनी सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@