आजपासून घरोघरी फिरून पोलिओ लस देणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |

६५३ समूह ५ दिवस करणार हे कार्य

 

 
नाशिक : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत ६९३ बुथवर १ लाख ४१ हजार १९१ बालकांना डोस देण्यात आले. दि.२९ पासून शहरात घरोघरी जाऊन मुलांना पोलिओ डोस दिल्याची खात्री करून घेण्यात येणार आहे.
 
आजच्या मोहिमेतून सुटलेल्या बालकांना डोस पाजण्यात येणार आहे. हे काम सलग पुढील पाच दिवस केले जाणार आहे. त्याकरिता एकूण ६५३ टीम व १५३ आय.पी.पी.आय. पर्यवेक्षक काम करणार आहेत. प्रत्येक टीममध्ये दोन कर्मचारी असतील व प्रत्येक ५ टीमकरिता एक पर्यवेक्षक त्या कामाचे मूल्यमापन करणार आहे. या सर्व कामाचा आढावा एकत्रितरित्या शासनास कळविण्यात येणार आहे. दरम्यान या मोहिमेचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात करण्यात आले.
 
याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, पंचवटी सभापती प्रियांका माने, नगरसेविका विमल पाटील व नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी शहरात एकूण ६९८ बूथ, ८६ ट्रान्झिट टीम, ४० फिरते पथक, ८ नाईट टीमअशी यंत्रणा आली होती. याकरिता एकूण २०४१ कर्मचारी,१५७ पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य), आर.सी.एच. नोडल ऑफिसर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@