पाकिस्तानने केले पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लघंन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |

 
नौशेरा :  जम्मू काश्मीर येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. येथील वस्ती असलेल्या भागात गोळीबार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाकिस्तान कडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात येत आहे. याला भारतीय सेना चोख प्रत्यूत्तर देत आहे.
 
दरम्यान काही दिवसांआधी देखील पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला. चंदन कुमार राय असे शहीद झालेल्या जवानाचे नाव होते. तसेच यावेळी दोन नागरिक देखील मृत्युमुखी पडले होते. या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्यूत्तर दिले.
 
याआधी भारताने पाकिस्तानी घुसखोरांविरोधात कारवाई केली. त्यावर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तान कडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@