मराठी भाषा राज्यभर सक्तीची करा : लक्ष्मीकांत देशमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : ’’मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण राज्यभर ती सक्तीची केली पाहिजे,’’ अशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
 
आर्टिलरी सेंटर रोडवरील जैन भवन येथे मसापच्या नाशिकरोड शाखेतर्फे देशमुख यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते देशमुख यांचा मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार झाला. व्यासपीठावर आ. बाळासाहेब सानप, जि.प. अध्यक्षा शीतल सांगळे, व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड, बार असोसिएशनचे अॅड. नितीन ठाकरे, श्रीकांत बेणी, मसाप नाशिकरोड शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी आदी होते.
 
यावेळी देशमुख म्हणाले, ’’सद्यस्थितीत प्रत्येक बाबतीत सोशल मीडिया जागरूक झाले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आवश्यक आहे. यासाठी आपण राज्य शासनाकडे मागणी करणार आहोत. बालमजुरी हा भारताला लागलेला मोठा कलंक असून त्याचे समूळ नष्ट करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लेखकांनी वंचित घटकांच्या वेदना समाजापुढे मांडून सद्यस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
 
याप्रसंगी महापौर भानसी, जि.प. अध्यक्षा सांगळे, श्रीकांत बेणी यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन कामिनी तनपुरे तर आभार रवींद्र मालुंजकर यांनी मानले.
 
@@AUTHORINFO_V1@@