संत नामदेवांना सर्वोच्च सन्मान : नेवासकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 

 
नाशिक : “संत नामदेवांनी महाराष्ट्रात पांडुरंगाच्या पायरीची समाधी घेतली, ही त्यांची विनम्रता आहे परंतु आम्ही महाराष्ट्रासह पंजाबमध्ये त्यांना सर्वोच्च स्थानाचा आधार देत आलो आहोत, हा त्यांनी केलेल्या अनोख्या कार्याचा गौरव आहे,’’ असे प्रतिपादन घुमान येथील अखिल भारतीय बहुभाषा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण नेवासकर यांनी केले.
 
अशोकस्तंभ येथील समस्त शिंपी समाजाच्या कार्यालयात माघ शुद्ध द्वितीया हा नामदेवरायांच्या पंजाबमधील भाव समाधीचा दिवस आहे. त्याचे औचित्य साधून नाशिकमध्ये नामदेव भक्तीपीठाच्या वतीने ’नामदेव चिंतनिका’ या ग्रंथाचा आयोजित लोकार्पण व प्रकाशन समारंभ करण्यात आला. त्या निमित्ताने उपस्थित बांधवांना संत नामदेवांच्या कार्याचे महत्त्व विशद करताना अरुण नेवासकर बोलत होते.
 
या प्रसंगी अवतारसिंग पनफेर, सूर्यकांत धटिंगण, संजीव तूपसाखरे आदी मान्यवर उपस्थित होते. संत नामदेवांच्या जीवनकार्यावर पुस्तके लिहून आपले जीवन नामदेवचरणी अर्पण करून जीवन व्यतीत करणारे अभ्यासक पंढरपूर निवासी आचार्य प्र. द. निकते यांनी नित्य नामदेवांच्या अभंगाचे विवेचन करून नामदेव चिंतनिका हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात नामदेव, जनाबाई व त्यांच्या परिवारातील अभंगाचे दर्शन घडवून आणण्यात आले.
 
@@AUTHORINFO_V1@@