गोविंद पानसरे हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेला जामिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 
 

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी वीरेंद्र तावडेला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामिन मंजूर करण्यात आला आहे.
 
 
 
यावेळी तावडेवर कोल्हापुरात येण्यास बंदी घालण्यात आली असून पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये आणि दर शनिवारी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावावी या अटी घालण्यात आल्या. पानसरे हत्या प्रकरणात न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून ३० जानेवारीला याबाबतचा निकाल देण्याचे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे आज जामिन मंजूरीचा निकाल देण्यात आला.
 
 
 
यापूर्वी पानसरे हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी समीर गायकवाड यालाही १८ जून २०१७ रोजी दीड वर्षांच्या चौकशीनंतर पुराव्याअभावी जामीन मंजूर करण्यात आला होता. गायकवाडला सप्टेंबर २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.
 
 
 
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे दाम्पत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता यामध्ये गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे जखमी झाल्या होत्या, तसेच पानसरे यांच्यावर कोल्हापूरात उपचार सुरु करण्यात आले होते मात्र पुढील उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले. उपचारादरम्यान २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र या हत्या प्रकरणाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाही खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस अपयशी ठरले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@