प्लास्टिकमुक्ती कडून आयुर्वेदाकडे : जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : परिसर प्लास्टिकमुक्त झाला तर मानव आयुर्वेदाकडे वळायला वेळ लागणार नाही. झाडे लावणे हे आपले नैतिक कर्तव्य असून शासनाने उचललेला प्लास्टिकमुक्तीचा विडा पर्यावरणाला लाभदायक आहे. भारत प्लास्टिकमुक्त करणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे मत साने गुरुजी शिक्षणसंस्थेचे सचिव प्रवीण जोशी यांनी व्यक्त केले.
 
नाशिक तालुक्यात असणार्‍या शिलापूर गावात राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संस्थेच्या माध्यमातून आणि शासनाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मिलिंद पगारे, गणपतराव मुठाळ, उपप्राचार्य अशोक अरिंगळे, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी विलास खंदारे, सहायक कार्यक्रम अधिकारी मंगेश जोशी, प्रा. अश्विनी दापोरकर, लीलाबाई कहांडळ, मंगेश कहांडळ, माधवराव काहांडळ उपस्थित होते.
 
कार्यक्रमात मिलिंद पगारे यांनी प्लास्टिकमुक्तीवर विद्यार्थ्याना माहिती दिली. तसेच प्लास्टिकचा वापर आरोग्याला कसा घातक आहे. हे चित्रफितीद्वारे दाखवून दिले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण प्लास्टिकचा वापर करीत असतो. तो धोकादायक असून कॅन्सर आणि त्या दृष्टीने होणारे आजार हे प्लास्टिकच्या अतिवापराने होतात, असे यावेळी मिलिंद पगारे यांनी सांगितले. या वेळी गावातले प्लास्टिक गोळा करण्यासाठी कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. गावातील जिल्हा परिषदेची शाळा आणि के. जे. मेहता ज्युनियर कॉलेजच्या स्वयंसेवकांनी गावातील प्लास्टिक गोळा केले.
 
@@AUTHORINFO_V1@@