केंद्र व राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवा : पारधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |
 
 
 
नाशिक : ’’केंद्र आणि राज्य शासनाच्या कामगिरीवर जनता खुश असून या दोन्ही सरकारांनी घेतलेल्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवा,’’ असे आवाहन भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी यांनी केले.
 
अनुसूचित जाती मोर्चातर्फे नाशकात भाजप मुख्यालय वसंतस्मृती येथे आयोजित महानगर कार्यकारिणी बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून पारधी बोलत होते. व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आ. बाळासाहेब सानप, अनुसूचित मोर्चाचे प्रदेश महासचिव अशोक कानडे, महानगर अध्यक्ष संजय गालफाडे, प्रदेश उपाध्यक्ष संपत जाधव, सरचिटणीस शशांक हिरे, सुरेश बर्वे, विजय चव्हाण, कैलास हादगे, जया वाघ, नगरसेविका कोमल मेहरोलिया, पूनम सोनवणे, पूनम धनगर, प्रियांका घाटे, भगवान दोदे, रवींद्र धिवरे, अॅड. शाम बडोदे, प्रा. शरद मोरे, हेमंत शेट्टी, भाजप महानगर संघटन सरचिटणीस नगरसेवक प्रशांत जाधव, नंदकुमार देसाई, कुणाल वाघ, महेश ढकोलिया, राहुल निरभवणे, उज्वला हिरे आदी उपस्थित होते.
 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष अनुसूचित मोर्चाची जबाबदारी मोठी राहणार असून त्यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू करावी आणि घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे, असे आ. बाळासाहेब सानप यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रास्ताविक अनुसूचित मोर्चाचे महानगर अध्यक्ष संजय गालफाडे यांनी केले. बैठकीस राजू मोरे, कुंदन खरे, किरण पगारे, सुनील कापसे यांच्यासह मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@