पाकव्याप्त काश्मीरमध्ये तरुणांसाठी निवडणुकांमध्ये आरक्षण !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |


इस्लामाबाद : काश्मीर तरुणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पाकिस्तान सरकारने आता आणखीन एक नवीन प्रयत्न सुरु केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या पुढे होणाऱ्या स्थानिक निवडणूकांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान राजा फारुख हैदर खान यांनी याविषयी आज घोषणा केली आहे. काश्मीरच्या राजकारणामध्ये तरुणांना देखिल थेट सहभाग घेता यावा, तसेच काश्मीरमधील तरुणांचा राजकारणातील सहभाग वाढवा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे हैदर खान यांनी म्हटले आहे. तसेच हे नवीन आरक्षण येत्या निवडणुकांपासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



काश्मीरमध्ये यावर्षी स्थानिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये काश्मीरमधील तरुणांना प्रत्येक स्थानिक निवडणुकीमध्ये २५ टक्के आरक्षण यापुढे देण्यात येणार आहे. यामुळे तरुणांच्या राजकारणाकडे कल वाढेल व काश्मीरच्या राजकारणात त्यांच्या सक्रीय सहभाग होईल, अशी आशा पाकिस्तानला वाटत आहे.
@@AUTHORINFO_V1@@