राज्य पोलीस दलाच्या स्थापनादिनानिमित्त जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |


यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त यवतमाळ पोलिसांकडून जिल्ह्यात 'वर्धापनदिन साप्ताह' या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले  आहे. या कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात पुढील आठवडाभर पोलीस दलाकडून अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांना पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबद्दल तसेच पोलीस दलांच्या शस्त्रांबद्द्ल माहिती देण्यात आली. यानंतर विद्यार्थांसह पोलीस दलाची शहरामधून रॅली काढून नागरिकांना राज्य पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त माहिती दिली.

तसेच नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील एकी आणि संबंधांमध्ये वाढ व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर सिग्नलला थांबलेल्या नागरिकांना पुष्प आणि शुभेच्छापत्र दिली. तसेच नागरिकांनी देखील यावेळी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पोलीस दलाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.


@@AUTHORINFO_V1@@