लालू यादव यांच्यावरील अंतिम सुनावणी उद्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |



रांची : चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख लालूप्रसाद यांच्यासंबंधीची अंतिम सुनावणी उद्या करण्यात येणार असल्याची घोषणा सीबीआयच्या विशेष न्यायालयाने केली आहे. त्यामुळे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या अन्य साथीदारांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चारा घोटाळा प्रकरणी अंतिम सुनावणीसाठी लालू आणि त्यांच्या साथीदारांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी या सुनावणीसाठी लालू यांचे कुटुंबीय आणि समर्थक मोठ्या संख्येने न्यायालयामध्ये उपस्थित झाले होते. परंतु न्यायालयातील एक वकील बिंदेश्वरी प्रसाद यांचे आज अकस्मात निधन झाल्यामुळे न्यायालयाने या विषयीची सुनावणी उद्यावर ढकलली व लालू आणि त्यांच्या सर्व साथीदारांना उद्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बिहारमध्ये झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी गेल्या २३ तारखेला न्यायालयाने लालू आणि त्यांच्या सर्व साथीदारांना दोषी ठरवत, शिक्षेसाठी पात्र ठरवले. यानंतर यासंबंधीची अंतिम सुनावणी आज करणार असल्याचे सांगितले होते. परंतु न्यायालयीन वकिलाच्या अकस्मात झालेल्या निधनामुळे या सुनावणीला उद्यापर्यंत विराम मिळाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@