'भीमाकोरेगाव' बनला कर्नाटक निवडणुकांचा मुद्दा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

देशात सिद्धरामय्या सरकारच 'दलित'हिताचे निर्णय घेते

 



नवी दिल्ली :
भीमाकोरेगाव येथे झालेल्या जमावावरील हल्ल्याचे पडसाद देशभर उठत असतानाचा, कॉंग्रेस पक्षाने या मुद्द्याच वापर आगामी कर्नाटक निवडणुकांसाठी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 'भाजपशासित राज्यांमध्येच दलितांवरील हल्ल्यांमध्ये वाढत होत असून देशात एकमेव सिद्धरामय्या सरकारच दलितांच्या हिताच्या निर्णय घेत आले आहे' असे वक्तव्य कर्नाटक कॉंग्रेसचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी केले आहे. भीमाकोरेगाव येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'भीमाकोरेगाव येथे दलित बांधवांवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशाला पिडा होत आहे. भाजप आणि रा.स्व.संघाशी संबंधित असलेले मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे नावाच्या व्यक्तींनी हा हल्ला घडवून आणला आहे. या बाबतीत लवकरच कॉंग्रेस कठोर भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या दोघांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडू' असे मोईली यांनी म्हटले.




तसेच भाजपशासित राज्यांमध्येच दलितांवर सर्वाधिक हल्ले होत असून कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार हे देशातील एकमेव दलित हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. दलितांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना राहण्यासाठी घरे उपलब्ध व्हावीत, म्हणून राज्याच्या अर्थसंकल्पात दलितांसाठी वेगळी तरुतूद करणारे कर्नाटक हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कॉंग्रेस ही नेहमी दलित हिताची भूमिका घेत आली असून सध्याचे कर्नाटक सरकार त्याच मार्गाने चालत आहे, असे ते म्हणाले.


 

भीमाकोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याचे पडसाद आज संसदेत देखील उमटले. विरोधकांनी सरकारवर दलित विरोधी असल्याचा आरोप करत, दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. यावेळी विरोधक हे समाजात शांती निर्माण करण्याऐवजी अधिक तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करू पाहत आहेत, असा उलटआरोप भाजपने केला होता. यानंतर आता झालेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक खासदारांनी भीमाकोरेगावचा मुद्दा उपस्थित करत, कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकार हेच दलित हिताचे सर्वाधिक निर्णय घेते असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकांसाठी कॉंग्रेस भीमाकोरेगावला राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.  
@@AUTHORINFO_V1@@