कॉंग्रेसची नीती देखील 'फोडा आणि राज्य करा' : अनंत कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

भीमाकोरेगावच्या मुद्द्यावरून भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल




नवी दिल्ली : 'कॉंग्रेस पक्ष देखील सध्या इंग्रजांच्या विचारधारेवर चालत असून इंग्रजांप्रमाणे 'फोडा आणि राज्य करा' अशी नीती सध्या कॉंग्रेस भीमाकोरेगावच्या बाबतीत घेत आहे' अशी टीका केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी विरोधकांवर केली आहे. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खड्गे यांच्या आरोपांना उत्तर देताना लोकसभेत आज ते बोलत होते.

'भीमाकोरेगाव येथे झालेल्या घटनेवर उपाय काढायचे तो मुद्दा अधिक भडकवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जात आहे. कारण लागोपाठ सर्व निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे कॉंग्रेस सध्या इंग्रजांप्रमाणे 'फोडा आणि राज्य करा' या नीतीचा अवलंब करत आहे', असे त्यांनी म्हटले. तसेच समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल, असा प्रयत्न संसदेच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. परंतु विरोधक आपल्या वयक्तिक स्वार्थासाठी म्हणून समाजात फुट पडू इच्छित आहे, असे देखिल ते म्हणाले.


भीमाकोरेगाव येथे जमावावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद राज्याबरोबर आज लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देखील उमटले. या हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप करत, विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये आज गदारोळ केला होता. यातील लोकसभेमध्ये सरकारने विरोधकांच्या या आरोपांचा योग्य समाचार घेतला होता. परंतु राज्यसभेविरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@