इराणच्या आंदोलनाला अमेरिकेचा पाठींबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |


 
वॉशिंग्टन : इराण सरकारच्या विरोधात सुरु असलेल्या जन आंदोलनाला अमेरिकेने आज आपला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या इराणी जनतेला जगातील सर्व न्यायप्रिय आणि स्वातंत्र्यप्रिय देशांनी देखील आपला पाठींबा द्यावा, असे आवाहन देखील अमेरिकेने केले आहे.

अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत निकी हेले आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून या आंदोलना अमेरिकेचा पाठींबा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 'देशातील सरकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठवून इराणी जनतेनी फार मोठा पराक्रम केला आहे' अशी प्रतिक्रिया हेले यांनी दिली आहे. आपल्या विरोधात कोणी आवाज उठवल्यास इराण सरकारने कायम त्यांची गळचेपी केली आहे. तसेच वेळेप्रसंगी त्यांच्या हत्या देखील केल्या आहेत. त्यामुळे आपल्या अशा अन्यायी सरकार विरोधात जनतेनी केलेला हा उठाव कौतुकास्पद असून त्याला अमेरिकेचा कायम पाठींबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.




गेल्या तीन दिवसांपासून इराणमध्ये सुरु असलेल्या सरकार विरोधी आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या आंदोलनामध्ये २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रुहानी सरकारच्या फसलेले निर्णय आणि अर्थकारण या विरोधात नागरिकांकडून हा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@