दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन'ला देखील पोलीस सुरक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |


नवी दिल्ली : भीमाकोरेगाव येथील जमावावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे असलेल्या 'महाराष्ट्र सदन'ला देखील पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये देखील कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.

जमावावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात पुकारण्यात आलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला मुंबई आणि ठाण्यामध्ये हिंसक वळण प्राप्त होत आहे. अनेक ठिकाणी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारी वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे या आंदोलनाच कसलाही परिणाम दिल्ली आणि आसपासच्या परिसरावर होऊ नये, यासाठी दिल्ली पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यातूनचा 'महाराष्ट्र सदना'बाहेर कसलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सदनाला विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
 
 
दिल्लीबरोबरच उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भीमाकोरेगाव येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात आहे. 'महाराष्ट्र बंद'चे पडसाद आपल्या राज्यात देखील उमटू नये, म्हणून प्रत्येक ठिकाणी असलेले स्थानिक प्रशासन आपापल्या दृष्टीने काळजी घेत आहेत.  
@@AUTHORINFO_V1@@