सावित्रीबाई फुले यांची आज १८६ वी जयंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
महिला समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक सावित्रीबाई फुले यांची आज १८६ वी जयंती आहे. आजच्याच दिवशी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला होता. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
 
 
सावित्रीबाई फुले या महाराष्ट्र आणि भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीतील सर्वात महत्त्वाच्या महिला मानल्या जातात. महिला आणि दलित जातींना शिक्षित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नासाठी त्या ओळखल्या जातात. दलित महिलांना शिक्षण, विधवांना त्यांचे हक्क देण्यासाठी त्या जन्मभर लढल्या.
 
 
 
१ मे १८४७ रोजी सावित्रीबाई फुले यांनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढली. ही त्यांची पहिली शाळा होती व तेथेच त्या शिकवू देखील लागल्या. १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात समाजसुधारक ज्योतिबा फुले आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. त्यांनी १८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या.
 
 
 
मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप कष्ट घेतले. आज मुलींना शाळेत पाठवण्यात येते यामागे सावित्रीबाई फुले यांचे यश आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले होते. म्हणून त्यांनी विधवांनी सती जाणे, पती गेल्यावर केशवपन करणे या प्रथांवर आवाज उठविला. त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र राज्य हे वाईट प्रथांपासून मुक्त झाले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@