सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्याचे रा.स्व. संघातर्फे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

 
 
भीमा-कोरेगाव, पुणे, नगर रस्ता, आणि महाराष्ट्रातील इतर भागात गेल्या दोन दिवसात ज्या हिंसाचाराच्या दुर्दैवी घटना घडल्या त्या अतिशय दु:खद आणि निदनीय आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी या प्रसंगात शांतता राखण्याचे सर्वांना आवाहन करणारे पत्रक जारी केले आहे.
 
 
या पत्रकात लिहिले आहे की, अशा प्रकारच्या हिंसाचारी घटना समाजात तेढ निर्माण करतात, यामुळे जातीय सलोखा बिघडत असतो, या प्रसंगी सर्वांनी शांतता राखणे गरजेचे आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच जे समुदाय सध्या भीती आणि द्वेषाचे बीज पेरू पाहत आहेत, त्यांच्या जाळ्यात सामान्य व्यक्तींनी फसू नये, असे देखील आवाहन केले गेले आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना शांतता राखण्याचे आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत आहे, संघासाठी समाज हित नेहमीच सर्वतोपरी राहिले आहे, असे पत्रकाच्या शेवटी नमूद केले गेले आहे.
 
भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असून, अनेक समाजकंटक द्वेषाचे बीज रोवत आहेत, या सर्व परिस्थितीत सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या सामाजिक संघटनेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@