किरकोळ प्रकार वगळता नाशकात शांतता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

भीमा कोरेगावचे पडसाद
 

 

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे पडसाद नाशिक शहर तसेच जिल्ह्यातही उमटले. शहर व जिल्ह्यातील काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांतता असून शहरात सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
दरम्याऩ, नाशिकरोड व जेलरोड परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूरच्या आयटीआय पूल परिसरात खासगी शाळेची बस व दोन खासगी चारचाकी वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
 
१ जानेवारीला वीरांचे स्मरण म्हणून पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी राज्यभरातून लाखो नागरिक जातात. सोमवारी या ठिकाणी दोन गटांत वाद होऊन दगडफेक झाली. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुले जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील मनमाड, मालेगाव येथे बंद पाळण्यात आला असून येवला तालुक्यातील सायगाव येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़. शहरात देवळाली कॅम्प परिसर बंद करण्यात आला आहे, तर नाशिकरोड परिसरातील रिपाइं, आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध करून दोषींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले.
 
गरवारे पॉईंट येथे ’रास्ता रोको’ करण्याच्या तयारीत असलेल्या काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीणमध्ये तर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@