प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे 'एनसीसी'चे शिबीर सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
दिल्ली: येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये सध्या तयारीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना अर्थात ‘एनसीसी’चे शिबीर सुरु झाले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे येत्या शनिवारी या शिबिराचे विधिवत उद्घाटन करणार आहेत.
 
 
या शिबिरात देशभरातून २०७० संघ भाग घेणार असून यातील जे संघ चांगले प्रदर्शन करतील त्या संघांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या संचलनात (परेड)मध्ये सहभागी करण्यात येणार आहे. या शिबिरात या संघांना प्रशिक्षण दिले जाईल तसेच या संघांना कुठल्या संचलनात बसवले जाईल याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
 
गार्ड ऑफ ऑनर, बँड, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रजासत्ताक संचलन (परेड), मनोरे अशा विविध गटात या विद्यार्थ्यांना विभागले जाते. ज्या गटात जो विद्यार्थी तरबेज आहे त्या गटात त्या विद्यार्थ्याला टाकले जाते. एकूणच संपूर्ण प्रशिक्षण देवून या विद्यार्थ्यांना संचलनासाठी तसेच इतर कार्यक्रमांसाठी तयार केले जात असून याचसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते.
 
यावेळी बँडचे दोन संघ या संचलनात भाग घेणार असून एक संघ मुलांचा तर एक संघ मुलींचा असणार आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळतो तसेच त्यांना नवीन शिकायला देखील मिळते. 
@@AUTHORINFO_V1@@