ओखी चाक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान द्राक्षांचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

१२८९.८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

 

 
नाशिक : ओखी चक्रीवादळाने नाशिक जिल्ह्यातील शेतीपिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. कृषीखात्याने प्रथमदर्शनी केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १४२ गावांतील ११८४ शेतक-यांचे १२८९.८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात द्राक्षाचे सर्वाधिक १२३१.२२ हेक्टर क्षेत्रावरील आणि दिंडोरीतील २० हेक्टरवरील कारल्याचे नुकसान झाले आहे.
 
ओखी वादळात काही ठिकाणी हलका तर काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला होता. तब्बल १२५.५ मिमी पावसाची नोंद यादरम्यान करण्यात आली होती. ढगाळ वातावरणामुळे बहुतांशी शेतीपिकांची चांगलीच हानी झाली. नाशिक, दिंडोरी, निफाड, सटाणा, चांदवड या पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. यात द्राक्षपिकांचे अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल कृषी विभागाकडे मूल्यमापनासाठी पाठविण्यात आला आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातही अवकाळीने सुमारे हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, तीन महिन्यांत तीनदा शेतीपिकांवर अस्मानी संकट ओढवले होते.
 
अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होतेच त्यात ओखीचे संकट आले. तसेच ६५ मिमी पावसाचा निकष लावल्यामुळे नुकसान होऊनही भरपाई मिळणार नसल्याने गंभीर झालेल्या शेतक-याला ओखी या नैसर्गिक आपत्तीने तारले. त्यातून भरपाई मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केल्याने दिलासा मिळाला. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार अहवालही जिल्हा प्रशासनास मिळाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@