शहीद मेजर प्रसाद महाडिक यांच्या पार्थिवावर विरारमध्ये अंत्यसंस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
खानिवडे : शहीद मेजर प्रसाद गणेश महाडिक (वय ३१) यांचा अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील मिल्ट्री कॅम्प तंबूला शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत उणे शून्य तपमानात आपल्या सहकार्‍यांसह कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाला होता.
 
त्यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी विरार येथे आणण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात विराटनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व इतर अनेक मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हजर होता. 'मेजर प्रसाद अमर रहे', 'भारतमाता की जय', अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
 
बँक मॅनेजर ते मेजर असा प्रवास
 
बोरिवलीतील अभिनव शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेले मेजर प्रसाद यांनी पुढे अंधेरीच्या भवन्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली होती. सुरुवातीला काही काळ त्यांनी एचएसबीसी बँकेत मॅनेजर म्हणून काम केले. मात्र त्यांना लष्करात रुजू होऊन देशसेवा करण्याची प्रचंड इच्छा होती. यामुळे त्यांनी आयपीएस परीक्षा दिली व ३० मार्च २०१२ रोजी ते सैन्यदलात रुजू झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@